Bharat Rashtra Samithi : केसीआर-संभाजीराजे भेटीनंतर आता माजी मुख्यमंत्र्यांचा BRSमध्ये प्रवेश

KCR
KCR

हैद्राबाद - भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) शुक्रवारी दुपारी हैदराबाद येथे विलीनीकरण महोत्सवाचे आयोजन केले होते. ओडिशाचे माजी मुख्यमंत्री गिरिधर गमांग यांनी पत्नी आणि माजी खासदार हेमा गमांग, मुलगा शिशिर गमांग आणि इतर प्रमुख नेत्यांसह अनेकांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. (Bharat Rashtra Samithi news in Marathi)

KCR
Sharad Pawar : "...तर पवार साहेब एक दिवसही अजित पवारांना पक्षात ठेवणार नाही", भाजप नेत्याचं टीका

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हे सर्व जण औपचारिकपणे बीआरएसमध्ये सामील झाले. ओडिशाचे प्रमुख शेतकरी नेते आणि नवनिर्माण किसान संघटनेचे संयोजक अक्षय कुमार, अनेक माजी आमदार आणि नेतेही यावेळी बीआरएसमध्ये सामील झाले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले, 'भारताचे भवितव्य बदलण्याचा, भारताचा विचार आणि विचारधारा बदलण्याचा संकल्प घेऊन भारत राष्ट्र समिती पक्ष उदयास आला आहे. ओरिसातून दूरदूरवरून महायुद्धात सहभागी होण्यासाठी आलेल्या बंधू-भगिनींचे मी स्वागत करतो. मी तुम्हा सर्वांचे कौतुक करतो. ओडिशाचे माजी मुख्यमंत्री, नेते, राजकारणी भीष्माचार्य गिरीधर गमांग, त्यांच्या पत्नी हेमा गमांग, त्यांचे पुत्र शिशिर गमांग आणि इतर नेत्यांचे स्वागत आहे.

KCR
वारकऱ्यांचे अपघात टळणार! ‘वारकरी मंडपा’ची सोलापूर ‘SP’ची आयडिया

अक्षय कुमार हे गांधीजींच्या पावलावर पाऊल ठेवणारे एक महान व्यक्त आहेत. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारे अनेक जण आज बीआरएसमध्ये सामील होत आहेत. बीआरएस सत्तेत आल्यास संपूर्ण देशाला २४ तास वीज आणि शेतीला मोफत वीज उपलब्ध होईल. शेतकऱ्यांसाठी किसान बंधू आणि दलितांसाठी दलित बंधू योजना राबविण्यात येईल, असंही ते म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील नेते आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केसीआर यांची भेट घेतली होती. त्यामुळे महाराष्ट्रातही तिसरी आघाडी सक्रीय होणार अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. एकंदरीतच केसीआर सध्या संपूर्ण भारतात बीआरएसचं वर्चस्व स्थापन कऱण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com