
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री उशिरा निधन झालं. शनिवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. २००४ नते २०१४ या कालावधीत ते देशाचे पंतप्रधान होते. पंतप्रधान असताना ते ७ रेस कोर्सवरील बंगल्यात १० वर्षे राहिले. त्यानंतर ते तीन मोतीलाल नेहरु मार्गावरील बंगल्यात रहायला गेले. गेल्या दहा वर्षांपासून ते कुटुंबियांसोबत या निवासस्थानी राहत आहेत. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर आता माजी पंतप्रधानांना मिळणाऱ्या सुविधा त्यांच्या कुटुंबियांना मिळणार का? त्यांची पत्नी गुरुशरण कौर यांना दुसरीकडे रहायला जावं लागणार का? इतर सुविधा कोणत्या मिळणार? असे प्रश्न चर्चेत आहेत.