esakal | माजी खासदार आणि वरिष्ठ पत्रकार चंदन मित्रा यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

माजी खासदार आणि वरिष्ठ पत्रकार चंदन मित्रा यांचे निधन

माजी खासदार आणि वरिष्ठ पत्रकार चंदन मित्रा यांचे निधन

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: राज्यसभेचे माजी खासदार (Former Rajya Sabha MP) आणि वरिष्ठ पत्रकार चंदन मित्रा (Chandan Mitra) यांचे काल रात्री दिल्लीत निधन झाले. त्यांचा मुलगा कुशन मित्राने चंदन मित्रा यांच्या निधनाची माहिती दिली. 2010 मध्ये भाजपाकडून दुसऱ्यांदा चंदन मित्रा यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. २०१६ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला.

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचे ते निकटवर्तीय होते. २०१४ मध्ये केंद्रात सत्ताबद्दल होऊन मोदी सरकार आले. त्यानंतर चंदन मित्रा यांना भाजपामध्ये फारशी संधी मिळत नव्हती. 'द पायोनियर' चे संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या चंदन मित्रा यांनी जुलै २०१८ मध्ये भाजपाला सोडचिठ्ठी देत तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

"अंतर्दृष्टि, निरीक्षण आणि हुशारीसाठी चंदन मित्रा यांची आठवण काढली जाईल. मीडिया आणि राजकारणात त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाबद्दल ऐकून दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि हितचिंतकांच्या दु:खात सहभागी आहे, ओम शांती" असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

loading image
go to top