
ईडीने याआधीही केडी सिंह यांच्या अनेक मालमत्तांवर छापा टाकला होता. त्यावेळी काही कागदपत्रे आणि परकीय चलन सापडलं होतं.
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. यातच आता तृणमूल काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकऱणी माजी राज्यसभा खासदार केडी सिंह यांना अटक केली आहे. बराच काळ ते ईडीच्या रडारवर होते.
मनी लाँड्रिंग प्रकरणी केडी सिंह यांना व्यवहारांबद्दल माहिती देऊ शकले नाहीत. त्यामुळे ईडीने त्यांना अटक केली. केडी सिंह हे तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेचे खासदार होते. बुधवारी ईडीच्या या कारवाईनंतर तृणमूल काँग्रेसनं प्रतिक्रिया दिली आहे. केडी सिंह यांचा आता पक्षाशी काही संबंध नाही असं सांगण्यात आलं आहे.
Former TMC MP KD Singh arrested by Enforcement Directorate (ED) in Delhi in connection with a money laundering case: Sources
— ANI (@ANI) January 13, 2021
केडी सिंह यांच्या अटकेवरून भाजप नेते शुभेंदु अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला आहे. शुभेंदु यांनी म्हटलं की, केडी सिंह यांच्या कंपनीने बंगालमध्ये लाखो लोकांची फसणूक केली आहे. त्यांची नारदा कंपनीला स्पॉन्सर केलं होतं. त्यांची संपत्ती जप्त करून लोकांचे पैसे परत केले पाहिजेत असंही अधिकारी यांनी म्हटलं.
हे वाचा - नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ प्रज्ञा ठाकूर पुन्हा मैदानात; म्हणाल्या, काँग्रेसने नेहमीच...
ईडीने याआधीही केडी सिंह यांच्या अनेक मालमत्तांवर छापा टाकला होता. त्यावेळी काही कागदपत्रे आणि परकीय चलन सापडलं होतं. 2018 मध्ये केडी सिंह यांच्यावर PMLA अंतर्गत केस करण्यात आली होती.
केडी सिंह यांची कंपनी अल्केमिस्ट इन्फ्रा रिअल्टी लिमिटेडवर ईडीने 2016 मध्ये गुन्हा दाखल केला होता. यात असा आरोप करण्यात आला होता की, कंपनीने लोकांना जवळपास 1900 कोटी रुपयांना फसवलं होतं. सेबीने कंपनी, कंपनीचे संचालक, शेअर होल्डर्सवर गुन्हा दाखल केला होता. याआधी त्यांची 239 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. यामध्ये रिसॉ़र्ट, शोरूम आणि बँक खात्याचा समावेश आहे.