माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचे निधन; एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 13 September 2020

रघुवंश प्रसाद सिंह यांच्या जाण्याने राजकारणात न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे

माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचे रविवारी निधन झाले. दिल्लीतील एम्सच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाननंतर जेडीयू केसी त्यागी यांनी शोक व्यक्त केलाय. रघुवंश प्रसाद सिंह यांच्या जाण्याने राजकारणात न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  दोन दिवसांपूर्वी अचानक उद्भभवलेल्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  

घाई गडबड केल्यानं चीन पडलं तोंडावर; लाँचिंगवेळी सॅटेलाइट भरकटल्याने क्रॅश

तीन दिवसांपूर्वीच लालू प्रसाद यादव यांना पत्र लिहून  त्यांनी राष्‍ट्रीय जनता दल (RJD) पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी एक पत्र लिहिले होते. प्रिय रघुवंश बाबू तुमच्या या निर्णयावर विश्वास बसत नाही. तुम्ही स्वस्थ होऊन राजद कुटुंबात परत याल, अशी आशा वाटते, असे म्हटले होते. 

हे वाचा - कोरोनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; ट्रम्प यांची धक्कादायक विधाने जगजाहीर

लालू यादव यांचे संकटमोचक 
रघुवंश प्रसाद सिंह 1977 पासून सातत्याने राजकारणात सक्रीय होते. लालू प्रसाद यादव यांचे विश्वासू आणि त्यांचे संकटमोचक अशी त्यांची ख्याती होती. पक्षामध्ये त्यांना दुसरे लालू असेही संबोधले जायचे. बिहारमधील वैशाली मतदार संघातून ते चारवेळा खासदार म्हणून निवडून आले होते. यूपीए सरकारच्या काळात त्यांनी मंत्रीपद भूषविले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former union minister and RJD leader raghuvansh prasad dies aiims delhi