घाई गडबड केल्यानं चीन पडलं तोंडावर; लाँचिंगवेळी सॅटेलाइट भरकटल्याने क्रॅश

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

अंतराळात सुपर पॉवर बनण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या चीनने त्यांच्या सॅटेलाइटची चाचणी घेतली. त्यामध्ये टार्गेट गाठण्यात सॅटेलाइ अपयशी ठरलं आणि मधेच भरकटल्यानंतर क्रॅश झालं.

बिजिंग - अर्धवट तयारी आणि घाई गडबडीत सॅटेलाइट लाँच केल्याने चीन तोंडावर पडलं आहे. अंतराळात सुपर पॉवर बनण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या चीनने त्यांच्या सॅटेलाइटची चाचणी घेतली. त्यामध्ये टार्गेट गाठण्यात सॅटेलाइ अपयशी ठरलं आणि मधेच भरकटल्यानंतर क्रॅश झालं. यामुळे चीनला मोठा धक्का बसला आहे. असा प्रकार चीनसाठी नवा नाही. घाई गडबडीत चाचण्या केल्यानं याआधीच त्यांच्या अनेक मोहिमा अपयशी ठरल्या आहेत. 

चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने या अपयशाची बातमी छापली आहे. यामध्ये म्हटलं आहे की, चीनचं ऑप्टिकल रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट जिलिन एफ गोफेन 02 सी (Jilin-1 Gaofen 02C) ठरवलेल्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरलं.  या सॅटेलाइटला Jiuquan सॅटेलाइट लाँच सेंटरवरून रात्री एक वाजून 2 मिनिटांनी लाँच करण्यात आलं होतं. यासाठी Kuaizhou-1a सॉलिड रॉकेटचा वापर करण्यात आला होता. 

हे वाचा - कोरोनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; ट्रम्प यांची धक्कादायक विधाने जगजाहीर

याबाबत लाँच सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, सॅटेलाइट लाँच होताच त्यावरील नियंत्रण गमावले होते. अखेर भरकटलेलं सॅटेलाइट क्रॅश झाल्यानं मोहिम अपयशी ठरली. तज्ज्ञांनी सांगितलं की, सॅटेलाइट अंतराळात भरकटलं आणि क्रॅश झालं. दरम्यान, या प्रकाराची चौकशी चीनची स्पेस एजन्सी करत आहे. अपयशाची कारणे शोधण्याचे काम ही एजन्सी करेल. 

हे वाचा - जगातील एक खंड जिथं कोरोनाला अजुनही नो एन्ट्री; बिनधास्त फिरतायत लोक

जगभरातील सॅटेलाइट लाँचवर नजर ठेवणारी वेबसाइस स्पेस न्यूज ने म्हटलं की, Jilin-1 Gaofen 02C सॅटेलाइट हाय रिझोल्युशून कॅमेरा सेटअपसह अद्ययावत करण्यात आले होते. चीनने 2020 मध्ये आतापर्यंत 26 सॅटेलाइट लाँच केली आहेत. त्यामध्ये चीनला 4 वेळा अपयशाला सामोरं जावं लागलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china mission failed satellite Jilin-1 Gaofen 02C crash during launching