कृषी कायद्याविरोधात आंदोलन,माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांना अटक

वृत्तसंस्था
Friday, 2 October 2020

सुखबीरसिंग बादल यांनी अमृतसर येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी शेतकरी या 'काळ्या कायद्या'च्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. अकाली दलाने रालोआची साथ सोडल्यानंतर 'किसान मार्च'चे आयोजन केले.

चंदीगड: नवीन शेतकरी कायद्याच्या विरोधात पंजाबच्या राज्यपालांच्या निवासस्थानाकडे मोर्चा घेऊन जात असलेले शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल, त्यांच्या पत्नी तथा माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांना गुरुवारी (दि.1) रात्री ताब्यात घेतले.

पोलिसांनी चंदीगड-मुलानपूर आणि चंदीगड-जिरकपूर सीमेवर अकाली दलाच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि पाण्याचा  मारा केला. दोन्ही सीमेवर राखीव दलाच्या जवानांसह मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चंदीगडकडे जात असलेल्या अकाली दलाच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अडथळे उभारले होते. 'आम्ही अकाली नेत्यांना काही काळासाठी ताब्यात घेतले होते. नंतर त्यांना सोडून दिले', असे चंदीगडचे पोलिस अधीक्षक कुलदीप चहल यांनी माध्यमांना सांगितले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तत्पूर्वी, सुखबीरसिंग बादल यांनी अमृतसर येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी शेतकरी या 'काळ्या कायद्या'च्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. अकाली दलाने रालोआची साथ सोडल्यानंतर 'किसान मार्च'चे आयोजन केले. यापूर्वी 17 सप्टेंबर रोजी हरसिमरत कौर यांनी संसदेत कृषी विधेयकाचा लोकसभेत विरोध करत केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, अटकेनंतर हरसिमरत कौर यांनी टि्वट करुन निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांसाठी आवाज उठवल्यामुळे आम्हाला अटक करण्यात आली आहे. परंतु, ते आमचा आवाज दाबू शकत नाहीत, असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Union Minister Harsimrat Kaur detained for protesting against agriculture law in chandigarh