
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचं निधन झालं. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद भूषवलेल्या कार्टर यांच्या नावावरून भारतातील एका गावाचं नाव कार्टरपुरी असंही ठेवण्यात आलंय. गुरुग्रामच्या दौलतपूर नसीराबाद इथं जिमी कार्टर यांच्या आई दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आल्या होत्या. आता जिमी कार्टर यांच्या निधनानंतर गुरुग्रामच्या कार्टरपुरी इथल्या लोकांनी आठवणी जाग्या केल्या.