दिल्ली भाजप मुख्यालयात कोरोनाचा स्फोट; 42 कर्मचारी पॉझिटिव्ह

सोमवारी बैठकीपूर्वी करण्यात आलेल्या टेस्टमध्ये हे सर्व जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
BJP Head Quarter
BJP Head Quarter Google

नवी दिल्ली : दिल्लीतील भाजप मुख्यालयातील 42 कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी भाजपच्या कोअर ग्रुपच्या बैठकीपूर्वी करण्यात आलेल्या टेस्ट करण्यात आली होती, त्यात 42 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, संसर्ग झालेल्यांपैकी अनेक जण स्वच्छता कर्मचारी असल्याचे सांगितले जात असून, या सर्वांना सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Forty two staff at the BJP headquarters in Delhi have tested positive)

BJP Head Quarter
ट्रान्सजेंडर व्यक्तीला पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक; होतेय टीका!

मंगळवारी भाजपच्या उत्तर प्रदेश विधानसभा (UP Election 2022) निवडणुकीबाबतच्या कोअर कमिटीची (BJP Core Group Meeting ) बैठक पक्षाच्या मुख्यालयात पार पडली होती. त्यानंतर बैठकीची दुसरी फेरी आज होणार आहे. त्यापूर्वी 42 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

BJP Head Quarter
भारताला दोन गोष्टींमुळे पत्करावी लागेल जोखीम; WEF चा इशारा

अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण

सोमवारी भाजपचे प्रमुख जेपी नड्डा (JP Nadda Tested Positive) यांची देखील कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह (Corona Test) आल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांनी संपर्कात आलेल्यांनी स्वतःची टेस्ट करून घेण्याची विनंती केली होती. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज एस बोम्मई, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांची दोखील कोरोना टेस्ट सोमवारी पॉझिटिव्ह आली होती.

याशिवाय भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राधामोहन सिंग यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तत्पूर्वी त्यांनी सोमवारी लखनौमध्ये पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीला हजेरी लावली होती. यामध्ये यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि यूपी भाजपचे प्रमुख स्वतंत्र देव सिंह हे देखील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com