Dinosaur : भारतात सापडले झाडपाला खाणाऱ्या डायनासोरच्या वेगळ्या प्रजातीचे अवशेष

जैसलमेर येथे सापडलेल्या जीवाश्‍मामध्ये डायनासोरच्या मानेपर्यंतचा मणका शरीराचा मध्यभाग आणि शेपटाचा भाग सापडला आहे.
Dinosaur
Dinosaursakal

नवी दिल्ली - भारतीय तंत्रज्ञान संस्था(आयआयटी)रुडकी येथील शास्त्रज्ञ आणि भारतीय भूसर्वेक्षण विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या संशोधनामध्ये राजस्थान येथील जैसलमेर येथे झाडपाला खाणाऱ्या डाइक्रायोसॉरिड प्रजातीमधील डायनासोरचे जीवाश्‍म सापडे आहेत. याबाबतची माहिती नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या एका अहवालात देण्यात आली आहे.

हे जीवाश्‍म सुमारे १६ कोटी ७० लाख वर्षांपूर्वीचे असल्याचे या शास्त्रज्ञांनी सांगितले. या नवीन संशोधनामुळे भारत हा डायनासोरच्या उत्क्रांतीच्या प्रमुख केंद्रांपैकी एक असल्याची बाब समोर आली आहे. ‘थारॉसोरस इंडिकस’ असे या डायनासोरचे नामकरण करण्यात आले आहे.

जैसलमेर येथे सापडलेल्या जीवाश्‍मामध्ये डायनासोरच्या मानेपर्यंतचा मणका शरीराचा मध्यभाग आणि शेपटाचा भाग सापडला आहे. या डायनासोरच्या मणक्यातील कशेरू(लहान हाड) ही वैशिष्ट्यपूर्ण आणि लांब असल्याचे आढळून आले आहे. मानेचा भाग अधिक उन्नत असल्याचे निदर्शनास आले आहे.

हे जीवाश्‍म डाइक्रायोसॉरिड प्रजातीमधील सर्वात जुन्या जीवाश्‍मांपैकी एक असल्याचे मानले जात आहे. भारतात पहिल्यांदाच या प्रजातीचे जीवाश्‍म सापडले आहेत. या आधी चीनमध्ये डाइक्रायोसॉरिड प्रजातीमधील डायनासोरचे अवशेष आढळले आहेत. भारतात सापडलेले जीवाश्‍म हे त्याहूनही जुने आहेत.

चीनप्रमाणेच दक्षिण अमेरिकेतही या प्रजातीच्या डायनासोरचे जीवाश्‍म सापडले आहेत. आजचा दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि भारत हा त्याकाळात एकाच गोंडवाना प्रदेशाचा भाग होते, त्यामुळे या डायनासोरला स्थलांतर करता आले असेल असे अभ्यासकांचे मत आहे.

भारतीय भूसर्वेक्षण विभागाच्यावतीने २०१८ पासून येथे भूसर्वेक्षण आणि उत्खनन सुरू करण्यात आले होते. आयआयटी रुडकीचे सुनिल वाजपेई आणि देबाजित दत्ता या संशोधकांनी २०२२पासून यावर सखोल संशोधन सुरू केले. येथे सापडलेले जीवाश्‍म हे अन्य प्रजातींपेक्ष वेगळे असल्याचेही शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

म्हणून ‘थारॉसोरस इंडिकस’ नाव

जैसलमेरमध्ये सापडलेल्या जीवाश्‍माला ‘थारॉसोरस इंडिकस’ हे नाव का देण्यात आले या बद्दल सांगताना शास्त्रज्ञांनी सांगितले की, ‘‘भारतातील थरच्या वाळवंटाजवळ अवशेष सापडले म्हणून ‘थारॉसोरल’ आणि ज्या प्रदेशात या डायनासोरची वस्ती होती त्याचे दर्शक म्हणून ‘इंडिकस’ असे नाव देण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com