'आप'-नायब राज्यपालांचा वाद मिटविण्यासाठी 4 मुख्यमंत्र्यांची मोदींशी भेट

वृत्तसंस्था
रविवार, 17 जून 2018

पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ आणि आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन हा वाद मिटविण्यासाठी आवाहन केले आहे. त्यामुळे हा वाद मिटविण्यासाठी पंतप्रधान मोदी मध्यस्थी करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

नवी दिल्ली : दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप) आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यात सुरू झालेला वाद आता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे गेला आहे. याबाबत पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ आणि आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन हा वाद मिटविण्यासाठी आवाहन केले आहे. त्यामुळे हा वाद मिटविण्यासाठी पंतप्रधान मोदी मध्यस्थी करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी राज्यपालांविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन हा वाद मिटवण्याचे आवाहन केले. तसेच या सर्वांनी केजरीवाल यांना पाठिंबा देण्याची घोषणाही केली होती. याशिवाय त्यांची भेट घेण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, नायब राज्यपालांनी परवानगी नाकारल्याने संतापलेल्या ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. तसेच देशात सांवैधानिक संकट निर्माण झाल्याची टीका केली होती.  

दरम्यान, भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांच्या असहकारांच्या धोरणामुळे दिल्लीत राष्ट्रपती राजवटीसारखी परिस्थिती आहे, असा आरोप मुख्यमंत्री केजरीवाल यांनी काल (शनिवार) केला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four Chief Minister appealed to modi