वीजेच्या धक्क्याने चौघांसह बैलजोडी ठार

अमृत वेताळ
गुरुवार, 4 एप्रिल 2019

बेळगाव -  तुटुन पडलेल्या भाररहित वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांसह बैलजोडी मृत्यूमुखी पडली. ही घटना रामदुर्ग तालुक्‍यातील के. तिम्मापुर गावात बुधवारी (ता. 3) सायंकाळी घडली आहे. 

बेळगाव -  तुटुन पडलेल्या भाररहित वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांसह बैलजोडी मृत्यूमुखी पडली. ही घटना रामदुर्ग तालुक्‍यातील के. तिम्मापुर गावात बुधवारी (ता. 3) सायंकाळी घडली आहे. 

रेवप्पा कल्लोळी (वय 35) त्यांची पत्नी रत्नव्वा कल्लोळी (वय 30), मुलगा सचिन (वय 7) व रेवाप्पाच्या भावाचा मुलगा कृष्णा अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे वीजेच्या तारा तुटून पडल्या होत्या. सध्याकाळी रेवप्पा हे पत्नी मुलगा व भावाच्या मुलाला सोबत घेऊन बैलगाडीतून शेताला जात होते. मात्र, शेताकडे जाणाऱ्या वाटेवर तुटुन पडलेल्या तारेची त्यांना कल्पना आली नाही. बैलगाडीला तारेचा स्पर्श होताच चौघासह बैलजोडीही जागीच ठार झाली.

वादळी वाऱ्यामुळे वीज तारा तुटून पडल्याची कल्पना काहींनी हेस्कॉमला दिली होती. पण, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. घटनेची माहिती समजताच कटकोळ पोलिसांनी व हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देउन पंचमाना केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Dead due to Electric shock in Belgaum District