
व्हॅटिकन सिटी: पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर व्हॅटिकन येथे नऊ दिवसांच्या दुखवटा पाळण्यास सुरुवात झाली आहे. प्राचीन रोमन परंपरेनुसार दुखवट्याचे पालन केले जाते. या काळातच नवीन पोपच्या निवडीसाठी तयारी सुरू होत असून यानंतर कार्डिनल्सची विशेष बैठक बोलावली जाणार आहे.