काल पहाटे संगमघाटाजवळ स्नान करण्यास भाविक गेले होते. तेथे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये बेळगावातील चौघांचा मृत्यू झाला. आणखी ४ ते ५ जण बेपत्ता आहेत, तर ७ ते ८ जण जखमी झाले.
बेळगाव : प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथील महाकुंभमेळ्यात संगमघाटावर (Maha Kumbh Mela Stampede) काल झालेल्या चेंगराचेंगरीत बेळगावातील चौघा भाविकांचा (Belgaum Devotees) मृत्यू झाला. ज्योती हत्तरवाठ (वय ५०) व त्यांची मुलगी मेघा (१८, दोघीही रा. वडगाव, नाझर कॅम्प, बेळगाव), अरुण कोपर्डे (६८, शेट्टी गल्ली, बेळगाव) व महादेवी बावनूर (४८, रा. तिसरी गल्ली, शिवाजीनगर, बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत.