८ वर्षीय मुलीवर चौघांचा आळीपाळीने बलात्कार, हत्या करून नाल्यात फेकला मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape

८ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, हत्या करून नाल्यात फेकला मृतदेह

बंगळुरू : टाईल्स कारखान्यात काम करणाऱ्या मजुराच्या आठ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार (Mangluru 8 Years Old Girl Physical Abused) करून हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. कर्नाटकातील मंगळुरूमध्ये (Mangluru Karknataka) ही घटना घडली असून याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडसह चौघांचा २३ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जायबान (२१), मुकेश सिंह (२०), मुनिम (२०) आणि मनिष तिरकी, असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मुजरांचे नावे आहेत. हे चौघेही मंगळुरू येथून जवळच असलेल्या वामनजूर येथे टाईल्स फॅक्टरीमध्ये काम करत होते. पीडितेचे वडील देखील हे झारखंडचे रहिवासी असून ते देखील याच मजुरांसोबत काम करत होते. घटनेच्या चार दिवसांपूर्वी जायबान, मुकेश आणि मनिष यांनी दारू पिताना मुलीवर बलात्कार करण्याचा कट रचला. रविवारी कामावर जास्त मजूर नसल्याने हा कट रचण्यात आला. मुनिम हा पूत्तूर येथे कामाला आहे. तो आपल्या मित्रांना भेटायला आल्यानंतर त्याने देखील कटामध्ये सहभागी होण्याची तयारी असल्याचे सांगितले.

पीडिता रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फॅक्टरीच्या आवारात आपल्या भावासोबत खेळत असताना जायबानने तिचे अपहरण केले आणि स्वतःच्या खोलीत घेऊन गेला. त्यानंतर आरोपींनी मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. त्यामुळे ती वेदनेने विव्हळत होती. पण, नराधमांनी तिचा गळा आवळून खून केला. नराधम इतक्यावरच थांबले नाहीतर त्यांनी तिचा मृतदेह नाल्यात फेकून दिला.

हेही वाचा: मित्राच्या पत्नीवरच वारंवार बलात्कार, पतीला सोडण्यासाठी तगादा

मुकेश आणि मुनिम घटनेनंतर पुत्तूरला फरार झाले. कुटुंबीयांनी जवळपास ३ वाजण्याच्या सुमारास मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी जायबान आणि मनिष यांनी आम्हाला काहीच माहिती असं सांगत मुलीला शोधण्यात मदत करत होते. त्यानंतर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मंगळुरू पोलिसांना त्या मुलीचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी टाईल्स फॅक्टरीमध्येच काम करणाऱ्या १९ जणांना ताब्यात घेतले. तसेच फॅक्टरीतील सीसीटीव्ही फुटेज मागवले. त्यानुसार या चौघांवर पोलिसांना संशय आला. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे पोलिस आयुक्त एन. शशीकुमार यांनी सांगितले.

loading image
go to top