भूतानच्या सीमेवर चीनने वसवली चार गावे; सॅटेलाइट फोटोंच्या अभ्यासातून उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भूतानच्या सीमेवर चीनने वसवली चार गावे, सॅटेलाइट फोटोंच्या अभ्यासातून उघड

भूतानच्या सीमेवर चीनने वसवली चार गावे; सॅटेलाइट फोटोंच्या अभ्यासातून उघड

नवी दिल्ली : चीन केवळ पूर्व लडाखमध्येच नव्हे तर अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमला लागून असलेल्या सीमावर्ती भागातही अतिक्रमण करून सीमावाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पण भारतीय जवानांच्या वाढलेल्या सतर्कतेमुळे त्यांचे मनसुबे फळाला येत नव्हते. त्यामुळेच चीन आता भूतानच्या भूभागावर अतिक्रमण करून सीमेवर भारतासमोरील आव्हान वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे. डोकलाम जवळील भूतानच्या हद्दीतील चार गावे चीनने वसवल्याची ताजी घटना बीजिंगच्या चालीचे द्योतक असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा: नासाने सॅटेलाइटद्वारे दिल्लीतील चित्र काढून सांगितले प्रदूषणा मागील कारण

डेट्रास्फा या ओपन सोर्स अकाउंटने उपग्रहा द्वारे काढलेले फोटो आणि संशोधकांच्या अभ्यासाचा हवाला देत दावा केला आहे की चीनने भूतानच्या सीमेवर चार नवीन गावे स्थापन केली आहेत, जी डोकलाम क्षेत्राच्या जवळ आहे. संशोधकांनी उपग्रह प्रतिमांच्या अभ्यासाच्या आधारे दावा केला आहे की, चीनने गेल्या एका वर्षात सुमारे 100 चौरस किलोमीटर क्षेत्रात ही चार गावे बांधली आहेत. डोकलामजवळील भूतानच्या भूभागात चीनची पायाभूत सुविधा भारतासाठी चिंतेची बाब आहे.

loading image
go to top