

मुरादाबादच्या बुद्धी विहार कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षिका रूबी रानी (३५) यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात फासावर लटकलेल्या स्थितीत आढळला. विशेष म्हणजे ही घटना उघडकीस आणणारी त्यांची अवघ्या चार वर्षांची मुलगी ओजस्वी होती. तिने व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या आजीला आईचा मृतदेह दाखवला आणि तिची बोलण्याची क्षमता हरवली आहे, असे सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे.