Job Fraud: विद्यार्थ्यांनो सावधान ! AIIMS मध्ये नोकरीचे आमीश देऊन घातला जातोय 18 लाखांचा गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud

Job Fraud: विद्यार्थ्यांनो सावधान ! AIIMS मध्ये नोकरीचे आमीश देऊन घातला जातोय 18 लाखांचा गंडा

AIIMS : मध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमीश देऊन विद्यार्थ्याकडून 17.65 लाख रुपये घेण्यात आले. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून बऱ्याच दिवसापासून पोलिस या आरोपीच्या शोधावर होते. सदर विद्यार्थ्यासह आणखी कोणत्या विद्यार्थ्याची फसवणूक तर केली नाही ना याचाही पोलिस शोध घेत आहे.

गोरखपूरच्या कँट पोलिसठाणे क्षेत्रातील कुडाघाटमध्ये AIIMS मध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष देऊन विद्यार्थ्याची फसवणूक तब्बल 18 लाखांची फसवणूक केली गेली. आरोपीची तक्रार झाल्यापासून पोलीस त्याच्या शोधावर होते. कन्हई कुमरा या विद्यार्थ्याने त्याची फसवणूक केली होती. (UP News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रमोद कुमारने एम्समध्ये नोकरीच्या नावाखाली 17 लाख 65 हजार रुपये घेऊन बनावट नियुक्तीपत्र दिले. याआधी डिजिटल ऑनलाइन सेंटरमध्ये काम करत असल्याचे आरोपीने पोलिसांच्या चौकशीत सांगितले. त्याच्या मालकाने आणि दोन भागीदारांनी त्याला एक ग्राहक शोधण्यास सांगितले जो त्या लोकांना पैसे देऊ शकेल.

त्याला बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक करण्याचा बेतही आखला. त्यांच्यासोबत मिळून आरोपींनी कन्हाई प्रसादकडून 17.65 लाख रुपये उकळले आणि त्याला बनावट नियुक्तीपत्र दिले.

हेही वाचा: योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

गोरखपूरचे सीओ कॅंट योगेंद्र सिंह यांनी सांगितले की, संत कबीर नगर येथील रहिवासी असलेल्या आरोपी प्रमोद कुमारला एम्समध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्तीपत्र देण्यात आले.

एम्समध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कसून चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिथून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.