
Free Bus Travel for Women on Raksha Bandhan 2025: देशभरात शनिवार, ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्त अनेक राज्यांमधील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी सरकारी बसमध्ये महिलांना तिकीट न आकरण्याचा निर्णय अनेक राज्यांमध्ये घेण्यात आला आहे. म्हणजे महिलांना मोफत बसप्रवास करता येणार आहे.
आता हा मोफत बसप्रवास काही राज्यांमध्ये दोन दिवस तर काही राज्यांमध्ये तीन दिवस असणार आहे. पंजाब आणि कर्नाटकात महिलांसाठी बससेवा मोफत आहे. तर दिल्लीच्या डीटीसी बसमध्ये केवळ दिल्लीच्या महिलांनाचा मोफत प्रवास करता येणार आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना उत्तरप्रदेश राज्य मार्ग परिवनह महामंडळ(यूपीएसआरटीसी) आणि नगर बस सेवेच्या बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे याबाबतची घोषणा खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच केली आहे. मुख्यमंत्री योगी यांच्या कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे की, ८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते १० ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत माता आणि भगिनी बसमधून मोफत प्रवास करू शकतील. या काळात प्रवास सुरळीत व्हावा यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात पुरेशा संख्येने बसेस उपलब्ध केल्या जातील.
राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी ९ ऑगस्ट रोजी आणि दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनाच्या दिवशी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. एका अधिकृत निवेदनानुसार, ही मोफत प्रवास सुविधा ९ आणि १० ऑगस्ट रोजी राजस्थानच्या सीमेवरील महिलांना उपलब्ध असेल. या उपक्रमांतर्गत, पहिल्यांदाच महिलांना सलग दोन दिवस परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये मोफत प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. यापूर्वी, त्यांना फक्त रक्षाबंधनाच्या दिवशी मोफत प्रवास करण्याची परवानगी होती.
रक्षाबंधनाच्या सणानिमित्त, १५ वर्षांपर्यंतच्या महिला आणि त्यांच्या मुलांना हरियाणा रोडवेज बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा दिली जाईल. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी या संदर्भातील प्रस्तावाला मान्यता दिली आहे. अशी माहिती हरियाणा वाहतूक मंत्री अनिल विज यांनी दिली आहे. तसेच हरियाणामध्ये धावणाऱ्या 'सामान्य बसेस' तसेच चंदीगड आणि दिल्लीला जाणाऱ्या बसेसमध्ये मोफत प्रवास उपलब्ध असेल. ही सेवा ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते ९ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत उपलब्ध असेल.
चंदीगडमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांनाही मोफत प्रवास करता येईल. ही सुविधा चंदीगड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग (CTU) आणि चंदीगड सिटी बस सर्व्हिसेस सोसायटी (CCBSS) द्वारे ट्रायसिटी क्षेत्रातील (चंदीगड, मोहाली आणि पंचकुला) चालवल्या जाणाऱ्या सर्व स्थानिक एसी आणि नॉन-एसी बसेसमध्ये लागू असेल.
रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना उत्तराखंड परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये मोफत प्रवास करता येईल. दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी महिला आणि लहान मुले उत्तराखंडच्या सरकारी बसेसमध्ये मोफत प्रवास करतात. या वर्षीही हा निर्णय लागू राहील.
याशिवाय, कर्नाटक, पंजाब आणि दिल्लीच्या सरकारी बसेसमध्ये महिलांसाठी आधीच मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशीही सरकारी बसेसमध्ये मोफत प्रवास करता येईल.
मध्य प्रदेशातही रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. भोपाळ सिटी लिंक लिमिटेड ९ ऑगस्ट रोजी महिलांना मोफत प्रवास देणार आहे. त्याच वेळी, इंदूरच्या महापौरांनी रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना मोफत प्रवास करता येईल असे म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.