डॉमिनोजकडून मिराबाई चानुला 'लाईफटाईम' पिझ्झा फ्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mirabai chanu

डॉमिनोजकडून मिराबाई चानुला 'लाईफटाईम' पिझ्झा फ्री

मुंबई - देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या मीराबाई चानुवर (mirabai chanu) सध्या सर्वस्तरांतून कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. तिनं वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळवून भारताला मोठं यश मिळवून दिलं आहे. त्यामुळे तिचे अभिनंदन होत आहे. ती ज्या राज्याची रहिवाशी आहे त्या मणिपूर राज्यानं तिला एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. यात आणखी एक भर पडली आहे ती म्हणजे डॉमिनोजनं (dominos) देखील मिराबाईच्या पराक्रमाची दखल घेतली आहे. आणि तिच्या गौरवासाठी तिला एक आगळीवेगळी भेट द्यायचं कबूल केलं आहे. (free pizza to mirabai for lifetime dominos offers yst88)

मणिपूरच्या मिराबाई चानुनं आता इतिहास घडवला आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तिनं वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळवले आहे. तिच्या विजयानं देशाचं नाव प्रकाशमान केलं आहे. यानिमित्तानं सध्या मिराबाईला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी तिचा विजयोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. कुटूंबियांच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी लोकांची रांग लागली आहे. वेगवेगळ्या संस्थांनी आता चानुचा मोठा सत्कार करण्याचे कार्यक्रम योजण्याचे ठरवले आहे. अशातच पिझ्झासाठी प्रसिद्ध असणाऱ्या डॉमिनोजनं देखील चानुला एक निराळं सरप्राईज दिलं आहे.

जगभरात पिझ्झासाठी डॉमिनोजचं नाव प्रसिद्ध आहे. या कंपनीनं मिराबाई चानुनं रौप्यपदक मिळवल्याची बाब पाहिली आणि त्यानंतर एक मोठी घोषणा केली. ती म्हणजे यापुढील काळात राणुबाईला लाईफ टाईम पिझ्झा देण्याची. कंपनीनं ट्विट करुन ही माहिती दिली आहे. कंपनीच्या या निर्णयावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कित्येकांनी त्याचे स्वागत केले आहे. कंपनीनं सांगितलं आहे की, ते ऑलिम्पिक विजेत्यांना आयुष्यभर फ्री मध्ये पिझ्झा देणार आहेत.

हेही वाचा: अभिनेत्री 'बाईंना' मीराबाई चानू माहित नाही; मग ट्रोल तर होणारच!

मीराच्या यशानं अब्जावधी भारतीयांना कमालीचा आनंद झाला आहे. कित्येकांनी तिला सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या आहेत. एका इंग्रजी दैनिकाला तिनं सांगितलं होतं की, मी आता पहिली भारतात गेल्यावर पिझ्झा खाणार आहे. बराच वेळ गेला आहे की, मी पिझ्झा खालेल्ला नाही.

टॅग्स :sports