योगींची पहिल्याच बैठकीत मोठी घोषणा, मोफत रेशन योजनेचा कालावधी वाढवला | Free Ration Scheme | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi Adityanath

योगींची पहिल्याच बैठकीत मोठी घोषणा, मोफत रेशन योजनेचा कालावधी वाढवला

लखनऊ : यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मोफत रेशन योजनेची मुदत 3 महिन्यांसाठी वाढवण्याची मोठी घोषणा केली आहे. यूपीच्या 15 कोटी लोकांसाठी मोफत अन्न योजना तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही योजना मार्च 2022 पर्यंत होती. दरम्यान, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत ही योजना महिन्यांसाठी वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे. (Yogi Extended Free Ration Scheme )

गरीबांना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयानंतर यूपीमध्ये नागरिकांना तीन महिन्यांसाठी मोफत रेशन दिले जाणार आहे, अशी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी दिली. केंद्र आणि राज्य सरकारची धोरणे लोकांपर्यंत पोहोचवायची असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ब्रजेश पाठक मागील सरकारमध्ये कायदा मंत्री होते. मात्र यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे.

हेही वाचा: तोवर राज्यातील सरकारला काही होणार नाही : अजित पवार

पक्षाने निवडणुकीदरम्यान जनतेला अनेक आश्वासने दिली होती त्यांनतर या आश्वासनांची पूर्तता केली जात असल्याचे या पहिल्या निर्णयानंतर दिसून येत आहे. योगी सरकारने मोफत रेशन योजनेला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता जून 2021 पर्यंत राज्यातील 15 कोटी लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे.

Web Title: Free Ration Scheme Extended For 3 More Months In Up

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top