esakal | वचनपूर्तीसाठी मोदींना ममतांचं पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi mamta

वचनपूर्तीसाठी मोदींना ममतांचं पत्र

sakal_logo
By
नामदेव कुंभार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. कोरोनाच्या (Covid 19) पार्श्वभूमीवर त्यांना राज्यात काही कडक निर्बंध लागू केले. निवडणूक प्रचारात राज्यात मोफत लसीकरणाचं दिलेलं वचन पूर्ण करण्याच्या दृष्टीनं ममता बॅनर्जी यांनी पावलं उचलली आहे. बुधवारी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अवघ्या काही तासांत त्यानी अनेक मोठे निर्णय घेतले. राज्यातील मोफत लसीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना पत्रही लिहिलं आहे. या पत्रात ममता बॅनर्जी यांनी राज्याला लसीचा मोफत पुरवठा द्यावा, अशी विनंती केली. लसीसोबतच आरोग्य व्यवस्थेची मागणीही केली आहे. यामध्ये मेडिकल ऑक्सजन आणि गोळ्या-औषधांचा समावेश आहे. (Free vaccine for all, adequate oxygen supply to states: Mamata Banerjee writes to PM Modi)

“ राज्यातील प्रत्येक नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे. सर्वांना मोफत लस मिळावी, असं उद्दिष्ट आहे. 24 फ्रेबुवारी 2021 रोजी तुम्हाला लिहिलेलं पत्र आठवत असेलच. त्यावेळीच पश्चिम बंगालला मोफत लस द्यावी, अशी विनंती केली होती, ” असं ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आपल्या पत्रात म्हटलेय. पत्रांमध्ये ममता बॅनर्जी यांनी चार मुद्यांकडे पंतप्रधान मोदी (PM Modi) यांचं लक्ष वेधलं आहे. सर्वांचं पारदर्शक पद्धतीनं वेळेत लसीकरण करण्यात यावं. राज्यातील आरोग्य व्यव्थेतेसाठी मदत करण्यात यावी. गोळ्या-औषधं आणि ऑक्सिजनचा पुरवठा, याबाबत ममता बॅनर्जी यांनी आपल्या पत्रात प्राकश टाकला आहे.

हेही वाचा: ममता अ‍ॅक्शन मोडवर, मुख्यमंत्री होताच घेतले मोठे निर्णय

ममतांनी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली -

‘बंगालची लेक’ या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या भावनिक सादाला प्रतिसाद देत येथील मतदारांनी तृणमूल काँग्रेसच्या हाती पुन्हा सत्ता सोपविली. ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज भवमधील थ्रॉन हॉलमध्ये आज सकाळी साधेपणाने झालेल्या सोहळ्यात राज्यपाल जगदीप धनकर यांनी बॅनर्जी यांना शपथ दिली. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बंगाली भाषेतून शपथ घेतली. या सोहळ्याला सर्व पक्षाच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आले होते, पण भाजपचे प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष हे या कार्यक्रमापासून दूरच राहिले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही त्याकडे पाठ फिरविली. काँग्रेसकडून प्रदीप भट्टाचार्य यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांचे रणनितीकार प्रशांत किशोर यांची उपस्थिती लक्षवेधक ठरली. ममतांचे भाचे व ‘तृणमूल’चे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्‍याबरोबर त्यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते.

हिंसाचार खपवून घेणार नाही

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीही राज्यपालांना आश्‍वासन देत सर्व राजकीय पक्षांना शांततेचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, ‘‘निकालानंतरच्या परिस्थिती माहिती आहे. मी हिंसाचार खपवून घेणार नाही. आजनंतर अशा घटना घडू नयेत यासाठी मी कायदा व सुव्यवस्था कठोरपणे अंमलात आणणार आहे. आतापर्यंत बंगालमध्ये निवडणूक आयोगाचा ताबा होता, आता आम्ही सर्व स्थितीचा निपटारा करू.’’