ममता अ‍ॅक्शन मोडवर, मुख्यमंत्री होताच घेतले मोठे निर्णय

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ममतांनी अनेक मोठे निर्णय घेतले.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeSakal Media
Summary

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ममतांनी अनेक मोठे निर्णय घेतले.

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ममतांनी अनेक मोठे निर्णय घेतले. कोरोनाच्या (Covid 19) पार्श्वभूमीवर त्यांना राज्यात काही कडक निर्बंध लागू केले आहेत. तसंच केंद्रावरसुद्धा निशाणा साधला आहे. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असून केंद्र सरकार आमच्या वाट्याचा ऑक्सिजन घेऊन जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय राज्यात डीजीपी आणि एडीजींच्या बदल्याही त्यांनी केल्या. निकालानंतर राज्यात सुरु असलेल्या हिंसाचाराच्या घटना रोखण्याचे आदेशही एसपींना दिले आहे.

निवडणूक आयोगाकडून पश्चिम बंगालच्या डीजीपी करण्यात आलं होतं. त्यांना आता अग्निशमन विभागाची जबाबदारी सोपवली आहे तर एडीजी जगमोहन यांच्याकडे नागरी सुरक्षा सोपवण्यात आली आहे. त्यांच्या जागी विरेंद्र यांना नवीन डीजीपी तर जावेद शमीम यांना एडीजी करण्यात आलं आहे.

Mamata Banerjee
ममतांनी तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, मोदींनी दिल्या शुभेच्छा

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही निर्बंध लागू केले आहेत. राज्यात आता मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसंच लोकल ट्रेन उद्यापासून बंद राहतील. याशिवाय बाजार सकाळी 7 ते 10 आणि सायंकाळी 5 ते 7 यावेळेत सुरु राहील. कोणताही सामजिक किंवा राजकीय कार्यक्रम होणार नाही.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, कोरोनाची परिस्थिती पाहता काही पावलं उचलावी लागतील. मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या कार्यालयांमध्ये फक्त 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल. शॉपिंग कॉम्प्लेक्स, जिम, सिनेमागृहे, ब्युटी पार्लर बंद करण्यात येत असून कोणत्याही समारंभांना, कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही.

Mamata Banerjee
मराठा आरक्षण रद्द; राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा शुभेच्छा देत अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी ट्विट करत ममतांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com