Omkareshwar Temple: ब्लड डोनेट करा अन् मोफत VIP दर्शन घ्या! ओंकारेश्वर मंदिराची भन्नाट ऑफर; भक्तांची गर्दी, ब्लड बँकही झाली फुल

Khandwa Omkareshwar Temple VIP Entry: मध्य प्रदेशातील प्रसिद्ध ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात रक्तदान करणाऱ्या भाविकांना मोफत व्हीआयपी प्रवेश देण्याची योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे.
Khandwa Omkareshwar Temple VIP Entry

Khandwa Omkareshwar Temple VIP Entry

ESakal

Updated on

'व्हीआयपी वागणूक' आणि देवाचे दर्शन घेण्याच्या इच्छेसाठी लोक काहीही करू शकतात... याचे एक अत्यंत सकारात्मक आणि अनोखे उदाहरण मध्य प्रदेशातील खांडवा येथे पाहायला मिळाले. भगवान शिवाच्या जगप्रसिद्ध ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचे मोफत व्हीआयपी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले आहे. खांडवा जिल्हाधिकारी ऋषभ गुप्ता यांच्या पुढाकाराने आरोग्य विभागाने सुरू केलेल्या या योजनेमुळे केवळ खांडवाच नव्हे, तर आसपासच्या जिल्ह्यांमधील रक्तपेढ्यांमध्येही मोठे परिवर्तन घडले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com