.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
भारताचे माजी मुख्य न्यायाधीश (CJI) डी. वाय. चंद्रचूड यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संभाव्य धोक्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. शुक्रवारी केरळ उच्च न्यायालयात "संविधानाच्या छत्राखाली बंधुता - समावेशक समाजाचा शोध" या विषयावर आयोजित व्याख्यानामध्ये त्यांनी हे मत व्यक्त केले. चंद्रचूड यांनी सांगितले की, जर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कोणत्याही प्रकारचे बंधन नसेल, तर समाजातील जास्त संसाधने आणि सत्ता असणारे लोक दुर्बल गटांच्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न करू शकतात.