काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

जम्मू काश्मीरमधील शोपियाँमध्ये भारतीय लष्करानी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शुक्रवारी (ता. 3) संध्याकाळी भारतीय लष्कराला किलोरा गावात लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर, जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली. 

श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील शोपियाँमध्ये भारतीय लष्करानी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शुक्रवारी (ता. 3) संध्याकाळी भारतीय लष्कराला किलोरा गावात लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर, जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली. 

शोधमोहीमेदरम्यान उडालेल्या चकमकीदरम्यान जवानांनी लष्करे तैयबाच्या कमांडरचा खात्मा केला. यानंतर शनिवारी (ता. 4) सकाळीदेखील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. त्यामध्ये चार दहशतवाद्यांचा ठार करण्यात आले.

चकमकीदरम्यान, लष्कर-ए-तोयबाचा कमांडर उमर मलिक ठार झाला आहे. घटनास्थळावरुन, उमर मलिकचं प्रेत ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याजवळील एके-47 देखील जप्त करण्यात आली आहे. शोधमोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याला भारतीय जवांनांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fresh firing at Shopian encounter site 5 LeT terrorist killed