Friendship day: 'त्यामुळे मी माझे मित्र विश्वास नांगरे पाटील यांना गुरू मानतो' - आर. माधवन

आदर्श विद्यार्थी पुरस्कारासाठी दोघांमध्ये लागली चुरस
R. Madhavan & Vishwas Nagare Patil
R. Madhavan & Vishwas Nagare Patilesakal

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल में, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

माधवनचा जन्म हा बिहारमधील जमशेदपूरमध्ये झाला. त्याचे वडील टाटा स्टीलमध्ये कामाला होते तर आई बँक ऑफ इंडियामध्ये... त्याचे बालपण बिहारमध्ये गेले असले तरी त्याचे शिक्षण महाराष्ट्रात झाले आहे. कोल्हापूरमधील राजाराम कॉलेजमध्ये त्याने शिक्षण घेतले आहे. या कॉलेजमध्ये तो शिकत असताना त्याच्यासोबत पोलीस अधीक्षक नांगरे पाटील देखील होते. त्या दोघांची त्या काळापासून मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी कॉलेजच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने माधवन आणि नांगरे पाटील यांनी दोघांनी देखील हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला होता. आर माधवने सांगितले होते की, राजाराम कॉलेजमध्ये असताना मी खूप काही शिकलो. त्या काळात मला भेटलेल्या लोकांना मी आयुष्यभर विसरू शकत नाही. कॉलेजमधील दिवस हे माझ्यासाठी सर्वात चांगले होते. यावेळी माधवनने त्याच्या भाषणाची सुरुवात मराठीत केली होती.

पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी या कार्यक्रमात माधवन आणि त्यांच्या मैत्रीविषयी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. ते म्हणाले होते की, आर. माधवन माझ्या कॉलेजमध्ये होता. तो माझा आदर्श होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्याच्यामध्ये जिद्द, आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी होती. तो खूपच मितभाषी तसेच अतिशय शांत होता. आमच्या मुलांमध्ये त्याचे इंग्रजी खूपच चांगले होते. त्यामुळे तो सर्वांना इंग्रजी शिकवत असत. आमचे इंग्रजी बोलताना उच्चार चुकत असतील तर तो आम्हाला लगेचच सांगत असे. त्यामुळे मी त्याला गुरू मानतो.

R. Madhavan & Vishwas Nagare Patil
Friendship Day: लहानपणी मैत्रीच्या मार्गात जेव्हा धर्म आड आला होता तेव्हा कलाम साहेब रडले होते.

आदर्श विद्यार्थी पुरस्कारासाठी माधवन आणि विश्वास नांगरे पाटील यांच्यात चुरस

कॉलेजच्या शेवटच्या वर्षी 'आदर्श विद्यार्थी' असा पुरस्कार दिला जात असे. या पुरस्कारासाठी माधवन आणि विश्वास नांगरे पाटील यांच्या चांगलीच चुरस होती. शेवटी हा पुरस्कार नांगरे पाटलांनीच पटकावला होता.

इंग्रजीत बोलायचा माधवन

माधवन नेहमीच इंग्रजीमध्येच बोलायचा. त्यामुळे कॉलेजवरचा इंग्रजाळलेला मुलींचा ग्रुप त्याच्या मागे असायाचा, असंही विश्वास नांगरे पाटील सांगतात.

कोल्हापूरबद्दल बोलताना माधवन थांबतच नाही. कॉलेजमध्ये शिकत असताना कोल्हापूरमध्ये मी मोठ्या प्रमाणात कष्ट केलं. त्यामुळंच भविष्यात मला यश मिळालं कोल्हापूरसारखी उर्जा इतर कोणत्याही शहरात नाही. त्यामुळं येथील लोकांनी जगभर नाव केलं आहे. येथ समाजसेवेचा, मदतीचा वारसा आहे'; असंही माधवन म्हणतो.

R. Madhavan & Vishwas Nagare Patil
Friendship day: सपना सोबत आहे शशांक केतकरची खास मैत्री, पण सपना आहे कोण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com