Friendship day: सपना सोबत आहे शशांक केतकरची खास मैत्री, पण सपना आहे कोण?

जाणून घेऊया शशांक केतकर आणि अभिनेत्री अनुजा साठे यांच्या मैत्रीतले खास किस्से..
friendship day 2023 : ek thi begum fame anuja sathe and shashank ketkar friendship
friendship day 2023 : ek thi begum fame anuja sathe and shashank ketkar friendshipsakal

friendship day 2022 : होणार सून मी ह्या घरची', 'हे मन बावरे', 'पाहिले न मी तुला' यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला शशांक केतकर (Shashank Ketkar) सर्वांचा लाडका अभिनेता आहे. आजही त्याला 'श्री' या नावानेच ओळखले जाते. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात घाकडलेल्या घडामोडी, भूतकाळ यावरील चर्चावर पडदा टाकून त्याने आता नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. शशांकच्या आयुष्यात मित्रमैत्रिणींची बरीच मोठी यादी आहे. पण एक अशी मैत्रीण आहे. ती त्याच्या खूपच जवळची आहे. जिला बापण सगळे 'सपना' या नावाने ओळखतो. तर जाणून घेऊया सपना आणि शशांकची खास मैत्री..
(friendship day 2022 : ek thi begum fame anuja sathe and shashank ketkar friendship)

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही 'सपना' कोण ? सपना म्हणजे 'एक थी बेगम' या वेब सिरिज मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अनुजा साठे. अनुजाने आजवर अनेक मालिका, चित्रपट केले आहेत पण तीची 'सपना' ही भूमिका सर्वाधिक चर्चेत आलेली भूमिका होती. गुन्हेगारी विश्वासी संबंधित विषयावर आलेल्या ह्या सिरिज ने अनुजाच्या आयुष्याला मोठी कलाटणी दिली. अत्यंत बोल्ड, साहसी अशा या अभिनेत्रीचे शशांकसोबतचे काही किस्से जाणून घेऊया..

अनुजा आणि शशांक हे दोघेही पुण्याचे. अनुजाचा मामा व शशांकचे वडील हे खूप जुने व खास मित्र. शशांक आणि अनुजा लहान असताना त्यांची एकदा भेट झाली होती. पण बालपणीच्या त्या भेटीनंतर ते एकमेकांसमोर आले ते थेट सुवासिनी मालिकेच्या सेटवर. अनेक वर्षांनी त्यांची पुन्हा एकदा भेट झाली व या मालिकेत एकत्र काम करतानाच त्यांच्यात छान मैत्री झाली.

अनुजाविषयी शशांक म्हणतो, 'अनुजा ही अतिशय समजूतदार, मेहनती व जिद्दी आहे. मनोरंजन सृष्टीत टिकाव धरून ठेवण्यासाठी जो स्वभाव आवश्यक असतो तसाच तिचा स्वभाव आहे. इथे तुम्हाला तुमचं म्हणणं स्पष्टपणे मांडावं लागतं, काही वेळा तुम्हाला तुमच्या म्हणण्यावर ठाम राहावं लागतं, तर काही वेळा थोडं नमतं घ्यावं लागतं; अनुजा अगदी तशीच आहे. तिच्यातला आत्मविश्वास आणि आपल्याला कुठलीच गोष्ट येत नाही असं नाही हे स्वतःला सांगत राहणं या दोन गोष्टी मला खूप भावतात व त्या मला आत्मसात करायला आवडतील. तिने मराठीबरोबरच हिंदी मनोरंजन सृष्टीत काम करण्याचा निर्णय घेतल्यावर तिने हिंदीचे रीतसर धडे घेतले. तिच्या एक थी बेगम या सिरीजचे दोन्ही सिझन प्रचंड गाजले, प्रेक्षकांना अनुजाचं काम आवडलं; हे सगळं तिने घेतलेल्या मेहनतीचं फळ आहे. त्यासोबतच लोकांशी संपर्क करून त्यांच्याशी जोडलेलं राहणं अनुजाला खूप छान जमतं. हेही मला तिच्याकडून शिकायला आवडेल.'

तर अनुजा शशांकबद्दल बोलताना म्हणाली, 'शशांकचा स्वभाव खूप साधा, मनमिळाऊ, समजूतदार आहे. तो खूप कष्टाळू आहे. इंजिनिअर झाल्यावर परदेशातून शिक्षण घेऊन तो पुन्हा भारतात आला व इथे आल्यावर त्याने त्याचं क्षेत्रच पूर्णपणे बदललं. ही त्याने घेतलेली मोठी उडी होती असंच मी म्हणेन. त्यावेळी ठामपणे त्याने काही गोष्टी ठरवल्या त्या तो आजपर्यंत मनापासून पूर्ण करतोय; यासाठी मला त्याचा खूप अभिमान वाटतो. जे आपल्याला मनापासून आवडतं आणि जे आपण मनापासून करायला हवं असं आपल्याला आतून वाटतं ते कायम करत राहणं हा शशांकमधला एक खूप महत्वाचा गुण घेण्यासारखा आहे. एकत्र काम करत असताना आम्ही भरपूर धमाल केली. कामाच्या वेळी तो त्याचं दोनशे टक्के देऊन काम करतो, तसंच दोन सिन्सच्यामध्ये मजामस्तीही तितकीच करतो.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com