Student Becomes monk at Prayagraj Magh Mela
sakal
उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील २२ वर्षीय अमर कमल रस्तोगी या तरुणाने संसाराचा त्याग करून संन्यास घेण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. १ जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या निमित्ताने 'लखनौमधील एका चर्चमध्ये दर्शनासाठी जातो आणि संध्याकाळपर्यंत परततो' असे सांगून तो घराबाहेर पडला होता. मात्र, तो घरी परतलाच नाही आणि त्याचा फोनही बंद झाला.