esakal | कर्नाटकातही 14 दिवस Lockdown, उद्यापासून अंमलबजावणी

बोलून बातमी शोधा

कर्नाटकातही 14 दिवस Lockdown, उद्यापासून अंमलबजावणी

कर्नाटकातही 14 दिवस Lockdown, उद्यापासून अंमलबजावणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : राज्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असल्याने आज (२६) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शासनाने राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यास लॉकडाऊन असे नाव न देता कोरोना कर्फ्यू असे नामकरण करण्यात आले आहे. राज्यात पुढील चौदा दिवस हा कर्फ्यु असणार आहे.

उद्यापासून (२७) या कर्फ्यूची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार पुढील चौदा दिवस सकाळी सहा वाजल्यापासून सकाळी दहा वाजेपर्यंत केवळ चार तास अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. यानंतर संपूर्ण दिवस कर्फ्यु असेल. परिवहन महामंडळाच्या बसेस देखील बंद ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे शहर, ग्रामीण आणि आंतरराज्य सेवा ठप्प होणार आहे. सकाळच्या वेळे मिल्क पार्लर, किराणा भाजी, मेडिकल आणि मद्य विक्री केंद्र सुरू राहणार आहेत. त्या व्यतिरिक्त इतर सर्व दुकाने आणि व्यवहार बंद ठेवली जाणार आहे.

हेही वाचा: नाद करायचा नाय! फॉर्च्युनर गाडीतून वांग्याची विक्री, चर्चा तर होणारच

राज्याच्या आर्थिकतेवर परिणाम होण्याचे लक्षात घेत औद्योगिक क्षेत्र सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार बांधकाम क्षेत्र सुरू ठेवले जाईल. मागील वर्षी बांधकाम क्षेत्र बंद ठेवण्यात आल्याने बांधकाम कामगारांना शासनाला अनुदान मंजूर करावे लागले होते. दरम्यान औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना ही आपले ओळखपत्र दाखवून कामावर हजर राहता येणार आहे.