
नीट युजी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या परीक्षेत राजस्थानमधील श्रवण कुमार यानं कमाल केलीय. श्रवण कुमार फॅक्ट्रीत काम करत करत अभ्यास करायचा. कष्टाच्या जोरावर त्यानं नीट परीक्षेत ओबीसी कॅटेगरीत ४०७१ रँक मिळवली. त्याचं कुटुंब मातीनं बांधलेल्या घरात राहतात. तर आई-वडील गावात सण-समारंभात भांडी धुण्याचं काम करतात.