खवखवणारा घसा, खोकल्यापासून मिळेल आराम; 'हे' पाच घरगुती उपाय ट्राय करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

health news

खवखवणारा घसा, खोकल्यापासून मिळेल आराम; 'हे' पाच घरगुती उपाय ट्राय करा

पावसाळ्याचे दिवस संपत आले असून आता हलक्या थंडीला सुरुवात झाली आहे. हवेत गारवा निर्माण होत आहे. या हवामानातील खराब वातावरणामुळे घसा दुखणे, सर्दी, खोकला अशा काही शारीरिक आजारांचा त्रास जाणून लागतो. ऊन-पावसाच्या खेळामुळे घशावर परिणाम होणे साहजिकच आहे. किरकोळ खोकला आणि घसादुखीसाठी, घरातील काही गोष्टी खाल्ल्या जाऊ शकतात. या गोष्टी घशातील हंगामी संसर्ग दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. तसेच ते घसा दुखणे, खोकला, खवखवणे आणि जळजळ होण्याची समस्याही दूर होते.

  • घशाच्या संसर्गावर घरगुती उपाय

मीठाचे पाणी

सुरुवातीला मिठाच्या पाण्याने घसा रिकामा करा. यासाठी घशाला गरम पाण्याचा शेक मिळेल. गरम पाण्याने गुळण्या केल्याने घशाला आराम मिळेल आणि साचलेला श्लेष्माही वितळेल. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून गार्गलिंग करता येते.

हेही वाचा: दातांच्या पोकळी, किडीपासून होईल सुटका; घरी बनवलेली हर्बल पावडर वापरा

मध

एक ते दोन दिवस आड एक चमचा मध खा. घशाच्या संसर्गामध्ये मध खाणे फायदेशीर आहे. कारण ते अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध आहे आणि जखमेच्या उपचारांच्या औषधाचा प्रभाव दर्शवते. कोमट पाण्यात मध मिसळून दिवसातून २ ते ३ वेळा प्यावे. एक वर्षापेक्षा लहान मुलाला मध देऊ नका.

मेथी

घशातील जंतुसंसर्ग आणि सूज दूर करण्यासाठी मेथीचे दाणे पाण्यात उकळून गाळून प्यावे. मेथीमध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थाचे गुणधर्म असतात. ज्यामुळे जळजळ आणि संसर्गाचा प्रसार कमी होतो.

हळद

एक कप गरम पाण्यात अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून गार्गल करा. हळदीतील औषधी गुणधर्म घसा खवखवणे आणि सूज दूर करण्यासाठी उपयुक्त आहेत. यामध्ये आढळणारे शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट घशाचे संक्रमण वेगाने कमी करतात.

हेही वाचा: Video Viral : मिठाई बनवताना झाडूने पाठ खाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल; लोक संतापले

चहा

असे अनेक चहा दुधाशिवाय बनवता येतात जे घशाला आराम देतात. आल्याचा चहा, दालचिनी चहा किंवा लवंग चहा घशाच्या संसर्गावर सर्वात प्रभावी आहे. याशिवाय कॅमोमाइल टी, ग्रीन टी आणि पेपरमिंट टीही पिऊ शकता.

टॅग्स :health newsCoughhealth