Video : हॉस्टेलबाहेर पडला नाहीत, तर तुमच्या जीवाचं बरंवाईट होईल; जामीया मिलीयातील विद्यार्थीनीचा आर्त स्वर

वृत्तसंस्था
सोमवार, 16 डिसेंबर 2019

नवी दिल्ली : मी इथे लॉचा अभ्यास करते, आज माझा संविधानाचा पेपर होता. पण कालपासून विद्यापीठाची स्थिती बघून आम्ही सगळे घाबरून गेलो आहोत. काल मुलींच्या व मुलांच्या हॉस्टेलमध्ये घुसून आम्हाला बाहेर काढण्यात आले. आम्हाला मारहाण करण्यात आली. मला सांगा अशा वातावरणात मी संविधानाचा अभ्यास का आणि कसा करू असा आर्त स्वर जामीया मिलीयाच्या विद्यापीठातून एका विद्यार्थीनीकडून ऐकू आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कालपासून जामीया मिलीया व अलीगढ विद्यापीठात पोलिसांचा लाठीचार्ज सुरू आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक (कॅब) संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर होऊन राष्ट्रपतींच्या सहीने त्याचे कायद्यात रुपांतर झाले. या कायद्याला ईशान्येकडील राज्यांमधून तीव्र विरोध होत आहे. या कायद्या विरोधातील आंदोलनाची धग दिल्लीला बसली. दक्षिण दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या परिसरात काल कॅब विरोधात हिंसक आंदोलन झाले. जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. यात काही आंदोलनकर्ते तर काही पोलिसही जखमी झाले आहेत.  

सौजन्य : NDTV

जामीया इस्लामिया विद्यापीठाबाहेर जाळपोळ, बस पेटवल्या; 'कॅब' विरोधाला हिंसक वळण

मी स्वतः मुस्लिम नाही, पण मी या आंदालनात पुढे आहे. आम्हाला काल सांगण्यात आले की, लवकरात लवकर विद्यापीठ सोडून बाहेर जा, नाहीतर तुमच्या जीवाचे बरेवाईट होईल. जीव वाचवण्यासाठी सगळे विद्यार्थी कालपासून इकडे-तिकडे पळत आहे, ही परिस्थिती केव्हा शांत होणार माहीत नाही. पण यामुळे आमचे प्रचंड नुकसान झाले आहे, असेही यावेळी या विद्यार्थीनीने सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: frustrated student from Jamial Milia express in front of media