

FSSAI action on 3 companies
esakal
New Delhi: प्रियागोल्ड बिस्किटांची निर्मिती करणाऱ्या सुप्रिया फूड अँड अॅग्रो कंपनीच्या विरोधात अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) कारवाई सुरू केली आहे. बिस्किटाचे उत्पादन करताना वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या नमुन्यामध्ये पशुखाद्याच्या निर्मितीसाठी वापरलेल्या जाणाऱ्या घटकाचा अंश आढळून आल्याचे एफएसएसएआयने म्हटले आहे. याशिवाय डोडला डेअरी आणि यूईआयआर ऑरगॅनिक फूड्स या कंपन्यांवरही कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये एफएसएसएआयने ही माहिती दिली आहे.