'ही' नोकरी फक्त आळशी लोकांसाठी, जाहीरात व्हायरल

सध्या सोशल मीडियावर आळशी आणि कंटाळा असलेल्या लोकांसाठी नोकरीची जाहीरात व्हायरल होत आहे.
job advertisement
job advertisementsakal

आळस हा माणसाचा शत्रू आहे, असे आपण म्हणतो पण जर याच आळस या अवगुणामुळे तुम्हाला नोकरी मिळत असेल तर.. हो हे खरंय. एक उत्तम नोकरी मिळवायची असेल तर त्यासाठी चांगले शिक्षण, चांगले व्यक्तीमत्व आणि आणि शिस्तप्रिय असणे आवश्यक आहे एखाद्या नोकरीसाठी आळस आणि कंटाळा हे अवगुणांची मागणी असेल तर आळशी लोकांसाठी ही मेजवानीच ठरेल.

सध्या सोशल मीडियावर आळशी आणि कंटाळा असलेल्या लोकांसाठी नोकरीची जाहीरात व्हायरल होत आहे. या नोकरीसाठी तुमच्याकडे फक्त दोन वाईट सवयी असणे आवश्यक आहे. एक सवय आहे आळशी असणे आणि दुसरी सवय आहे दुःखी असणे. जर तुम्हाला या दोन्ही वाईट सवयी असतील तर तुम्ही या नोकरीसाठी योग्य उमेदवार आहात.

job advertisement
उदयपूर हत्या प्रकरण: मंत्रालयाचे सोशल मीडियाला स्पष्ट निर्देश; ताबडतोब...

आताच्या काळात कोणतीही चांगली नोकरी मिळवण्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता असणं खूप गरजेचं आहे. कारण नोकरी करण्यासाठी तुमच्याकडे कोणतीतरी शैक्षणिक पदवी असणे आवश्यक आहे. किंवा तुमच्यात काही विशेष कलाकौशल्य असणे गरजेचे आहे. पण आता आम्ही तुम्हाला अशा कामाबद्दल सांगणार आहोत, ज्यासाठी तुम्हाला कोणत्याही पदवी किंवा कलाकौशल्याची गरज नाही.

विशेष म्हणजे एका जाहिरातीद्वारे लोकांना या नोकरीबद्दल सांगितले जात आहे. ही जाहिरात एका दुकानाबाहेर लावण्यात आली होती. तेव्हा कोणीतरी या जाहिरातीचा फोटो काढून ट्विटरवर टाकला. आता ही जाहिरातीची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे

job advertisement
सत्तेची भूक खूपच धोकादायक; महाराष्ट्राच्या राजकारणावर सिन्हांचं परखड भाष्य

खरं तर ही जाहिरात खरी आहे की खोटी याविषयी संभ्रम आहे. एखाद्याने मुद्दाम खोडकर वृत्तीने ही जाहिरात टाकली असू शकते. त्यामुळे ही जाहिरात खरीच आहे, असा दावा आम्ही करत नाही.

व्हायरल होत असलेल्या या जाहिरातीत त्यांना कशा स्टाफची गरज आहे, हे अगदी सविस्तरपणे सांगण्यात आले आहे. सुरुवातीला मोठ्या अक्षरात लिहिले आहे, कर्मचारी आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना कशा उमेदवाराची गरज आहे हे खाली लिहिले आहे. जाहिरातीमध्ये असे लिहिले आहे की, उमेदवार आळशी आणि सतत दुःखी असणारा पाहिजेत, जेणेकरून नविन निवडलेला कर्मचारी येथे आधीच कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांमध्ये मिळून-मिसळून राहू शकेल. इथे CV घेऊन या आणि फक्त येण्यापूर्वी स्वच्छ आंघोळ करा इतकंच.

job advertisement
पुढील 2-3 दिवसांत संपूर्ण भारतात मान्सूनचा होणार वर्षाव; हवामान खात्याचा इशारा

नोकरीच्या जाहिरातीचा हा फोटो सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.काही लोकांना ही नोकरी खूप आवडते. कारण त्यासाठी कोणत्याही विशेष प्रतिभा किंवा अनुभवाची गरज नाही. पोस्टवर लोक मजेशीर कमेंट करत आहेत. एका कमेंट्समध्ये लिहिले आहे की, मी या कामासाठी तयार झालो आहे तर दुसर्‍याने लिहिले की, यासाठी कुठे यावे लागेल?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com