Gajendra Singh Shekhawat : गौतम बुद्ध सर्किट बाईक मोहीम; गजेंद्रसिंह शेखावत यांचा पाठिंबा
Tourism Support : केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी गौतम बुद्ध सर्किट बाईक मोहिमेला पाठिंबा दिला आहे. ही मोहिम नेपाळच्या लुंबिनीपासून श्रीलंकेतील कोलंबोपर्यंत चालवली जाईल आणि तिन्ही देशांचे सैनिक यात सहभागी होणार आहेत.
नवी दिल्ली : नेपाळमधील लुंबिनी ते श्रीलंकेतील कोलंबोदरम्यान काढल्या जाणाऱ्या गौतमबुद्ध सर्किट बाईक मोहिमेला केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी पाठिंबा दिला आहे. तिन्ही देशांचे सैनिक मोटरसायकल रॅलीत सामील होणार आहेत.