India’s second public Ganeshotsav in Kashi
sakal
काशी :
शिवनगरी काशी आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक संबंध शतकानुशतके जुना आहे. याच नात्याची झलक काशीतील गणेशोत्सवातही पाहायला मिळते. पेशवे घराण्याने १८०७ मध्ये सुरू केलेल्या गणेशपूजेपासून ते लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने १८९८ मध्ये सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवापर्यंत काशीमध्ये मराठी परंपरेने गणपतीची आराधना केली जात आहे.
यंदाही शहरातील ५० हून अधिक पूजा मंडप आणि मंदिरांमध्ये मराठी पद्धतीने गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. षोडशोपचार पूजा, दूर्वा अर्पण आणि १५ वेळा ‘ॐ’काराचा उच्चार अशा पारंपरिक पद्धतींनी गणरायाची आराधना केली जात आहे.