Ganesh Chaturthi 2026

Ganesh Chaturthi 2026 News in Marathi | लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिले. या उत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध घटक एकत्र येऊ लागले आणि सामाजिक एकतेला बळ मिळाले. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातील महत्त्वाचा उत्सव आहे. गणेश मूर्तीची स्थापना भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी, शक्यतो मध्यान्हकाळातील शुभ मुहूर्तावर केली जाते. गणेशोत्सवाची ही परंपरा श्रद्धेसोबतच कला, संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि एकतेचा संदेश देणारी आहे. हा उत्सव साधारण दीड, पाच, सात अथवा दहा दिवस मोठ्या आनंदाने साजरा होतो. घरोघरी मोदकांचा नैवेद्य, आरत्यांचे स्वर, ढोल-ताशांचा गजर आणि नेत्रदीपक देखावे यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय बनते. अनंत चतुर्दशीला भावपूर्ण वातावरणात बाप्पाचे विसर्जन केले जाते.
Marathi News Esakal
www.esakal.com