Ganesh Chaturthi 2026 Khajrana Ganpati
sakal
मध्य प्रदेशातील इंदूरचे सुमारे ३०० वर्षे जुने खजराना गणेश मंदिर गणेशोत्सवानिमित्त आकर्षणाचे केंद्र बनले आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बाप्पाचा राजेशाही शृंगार करण्यात आला असून, सोने-चांदी, हिरे आणि नवरत्नांच्या दागिन्यांनी गणरायाला सजवण्यात आले आहे. या दागिन्यांची किंमत सुमारे ७ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. मंदिर परिसरालाही राजमहालासारखे रूप देण्यात आले असून, सजावटीसाठी तब्बल ३०० किलो विदेशी फुलांचा वापर करण्यात आला आहे.