Gurugram : मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या दहावीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; दोन आरोपींना अटक

'बराच वेळ होऊनही ती परत न आल्यानं आम्ही तिचा शोध सुरू केला, पण..'
Haryana Crime News
Haryana Crime Newsesakal
Summary

'बराच वेळ होऊनही ती परत न आल्यानं आम्ही तिचा शोध सुरू केला, पण..'

हरियाणाच्या गुरुग्राममध्ये (Gurugram Haryana) दहावीच्या विद्यार्थिनीवर (10th Class Student) तिच्या मित्रांसह पाच तरुणांनी येथील हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केला. शनिवार रात्रीच्या घटनेतील पाचपैकी दोन आरोपींना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांनी सांगितलं की, मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Civil Hospital) नेण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी बलात्काराची पुष्टी केली. डीसीपी (पश्चिम) दीपक सहारन म्हणाले, 'सोमवारी संध्याकाळी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे, तर इतरांचा शोध सुरू आहे.'

Haryana Crime News
Uniform Civil Code : समान नागरी कायद्याला असदुद्दीन ओवैसींचा तीव्र विरोध; म्हणाले, भाजपची ही जुनीच..

14 वर्षीय पीडितेच्या आईनं दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी दुपारी 12.30 च्या सुमारास तिची मुलगी घरातून निघून गेली होती. तिला वाटलं की आपली मुलगी जवळच्या उद्यानात फिरायला गेली असावी. बराच वेळ होऊनही ती परत न आल्यानं आम्ही तिचा शोध सुरू केला. मात्र, तिचा शोध लागला नाही, असं पीडितेच्या आईनं पोलिस (Police) तक्रारीत म्हटलंय. रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास माझी मुलगी घराजवळ सापडली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Haryana Crime News
आता Elon Musk स्वत: ट्विटरचे CEO बनणार; सर्व संचालक मंडळ बरखास्त!

हॉटेलमध्ये नेऊन सामूहिक बलात्कार

रात्रभर ती कुठे होती असं विचारलं असता, मुलीनं तिच्या आईला सांगितलं की, मला माझ्या दोन मित्रांनी दुचाकीवरून हॉटेलमध्ये नेलं. तिथं दोन तरुण आणि अन्य तिघांनी माझ्यावर बलात्कार केला. या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी तिला दिल्याचं पोलिसांना सांगितलं.

Haryana Crime News
HP Assembly Election : बंडखोरांवर भाजपची मोठी कारवाई; 5 नेत्यांना केलं निलंबित

पाच तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहितेच्या कलम 376-डी (सामूहिक बलात्कार), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचं संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलं की, मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तिथं डॉक्टरांनी बलात्काराची पुष्टी केली. काल (सोमवार) संध्याकाळी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com