Newborn Trafficking Racket Busted: नवजात बालकांच्या तस्करीचा पर्दाफाश; 8 जण पोलिसांच्या ताब्यात, असा सुरू होता मुले विकण्याचा प्रकार

Newborn Trafficking Racket Busted: दिल्लीत नवजात बालकांच्या तस्करीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 50 हजार ते 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत मुलांची खरेदी-विक्रीचा प्रकार सुरू होता.
Newborn Trafficking Racket Busted
Newborn Trafficking Racket BustedEsakal

दिल्लीत नवजात बालकांच्या तस्करीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 50 हजार ते 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत मुलांची खरेदी-विक्रीचा प्रकार सुरू होता. या प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी दिल्ली आणि पंजाबमधून 8 जणांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी नवजात बालकांच्या खरेदी-विक्रीशी संबधित होते. हे सर्वजण मानवी तस्करीचे रॅकेट चालवत होते. आरोपींमध्ये पाच महिलांचाही समावेश आहे.

या प्रकरणाशी संबधित माहिती गेताना आधिकाऱ्यांनी सांगितले, वेगवेगळ्या राज्यांमध्ये नवजात मुलांची खरेदी-विक्री करणाऱ्या मानवी तस्करीचे रॅकेट चालवल्याप्रकरणी पाच महिलांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तस्करीत सुमारे 10 ते 15 दिवसांच्या नवजात अर्भकाचीही सुटका केली आहे.

आरोपींपैकी पियुष अग्रवाल, राजिंदर, रमण अशी त्यांची नावे आहेत. महिलांमध्ये दोन दिल्लीतील आणि तीन पंजाबमधील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Newborn Trafficking Racket Busted
Pune Girls Drug Matter: ड्रग्ज घेऊन तरुणी आऊट ऑफ कन्ट्रोल! अभिनेत्यानं शेअर केला काळजीत टाकणारा व्हिडिओ

डीसीपी रोहिणी गुरीइकबाल सिंग सिद्धू यांनी सांगितले की, 20 फेब्रुवारी रोजी बेगमपूर पोलिस स्टेशन परिसरात बाळांच्या विक्री आणि खरेदीबाबत पीसीआर कॉल करण्यात आला होता. अधिकाऱ्याने सांगितले, "पोलिसांचे पथक ताबडतोब दिलेल्या पत्त्यावर पोहोचले आणि वस्तुस्थिती पडताळून पाहिली आम्हाला कळले की घरात एका नवजात मुलीसह दोन महिला होत्या.

“चौकशीदरम्यान, ते बाळांच्या पालकत्वाबद्दल समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. सतत चौकशी केल्यावर, त्यांनी खुलासा केला की ते एक आंतरराज्य मानवी तस्करी करणारी टोळी चालवतात जी उत्तर भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये नवजात मुलांची खरेदी आणि विक्री करते. त्यांनी सांगितले की ती मुलगी पंजाबमधील मुक्तसर येथून 50,000 रुपयांना विकत घेतली होती", असे पोसिसांनी सांगितले.

Newborn Trafficking Racket Busted
Pune Drugs Case : पुणे पोलिसांना हवा असलेला 'सॅम ब्राऊन' आहे तरी कोण? तीन महिन्यात दोन हजार किलो ड्रग्ज बनवण्याचं टार्गेट

अधिकाऱ्यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, महिला योग्य खरेदीदाराच्या प्रतीक्षेत होत्या. त्यांच्यावर गुन्हेगारी कटाशी संबंधित आयपीसी कलम आणि बाल न्याय कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

"चौकशी दरम्यान, महिलांनी त्यांच्या इतर टोळी सदस्यांची नावे देखील उघड केली." तपासादरम्यान, पंजाबमध्ये अनेक छापे टाकण्यात आले आणि तीन महिलांसह सहा जणांना अटक करण्यात आली. दिल्लीत अटक करण्यात आलेल्या एका महिलेचा यापूर्वी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंतर्गत मानवी तस्करी प्रकरणात सहभाग होता, असे पोलिसांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com