
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झालीय. दोन्ही नद्यांनी धोकापातळी ओलांडलीय. यामुळे अनेक भागात पाणी घुसलं आहे. गंगा नदीचं पाणी काही घरांमध्येही घुसल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक लोकांनी गंगा नदीचं पूजन केलं आहे. उत्तर प्रदेश पोलीस कर्मचाऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पोलीस घरात घुसलेल्या गंगा नदीच्या पाण्यात फुलं आणि दूध अर्पण करताना दिसत आहे.