
कोरोना विषाणुच्या संसर्गाच्या (Covid19) दुसऱ्या लाटेत देशात अत्यंत विदारक चित्र निर्माण झालं होतं. वाढलेली रुग्णांची संख्या, अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे (Health System) वैद्यकीय आणीबाणी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. विशेषत: उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) कोरोनाचा बळी ठरलेलेल्यांच्या मृतदेहांची देखील मोठ्या प्रमाणात अवहेलना होत असल्याचं दिसलं होतं. गंगा नदीत वाहणाऱ्या मृतदेहांचं दृष्य संपुर्ण देशाला हादरवून सोडणारं होतं. या संपुर्ण परिस्थितीला दुजोरा देण्याचं काम स्वच्छ गंगा मोहिमेच्या प्रमुखांनीच केलं आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्युचा आक़डा मोठ्या प्रमाणात वाढला होता. यावेळी गंगा नदी मृतदेहांना फेकण्यासाठीचं डम्पिंग ग्राऊंड झालं होतं. असं नमामि गंगे आणि स्वच्छ गंगा मोहिमेचे प्रमुख राजीव रंजन मिश्रा (Rajiv Ranjan Mishra) आणि आयडीएएस अधिकारी पुष्कर उपाध्ये यांनी पुस्तकात लिहीलं आहे. मृत्यूची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासनाने केलेली व्यवस्था अपुरी पडत होती. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगेला डम्पिंग ग्राऊंड म्हणून वापरलं जात होतं असं या पुस्तकात म्हटलं आहे. 'गंगा : रिइमेजिंग, रिजुनिएटींग, रिकनेक्टींग'(GANGA: RE-IMAGINING, REJUVENATING, RE-CONNECTING) नावाच्या पुस्तकात रंजन यांनी या विषयावर प्रकाश टाकला आहे.
मागच्या ५ वर्षांत गंगा स्वच्छता मोहिमेत वेगवेगळी पदं भूषवणारे मिश्रा हे १९८७ च्या तेलंगणा केडरचे आयएएस अधिकाही आहेत. मिश्रा ३१ डिसेंबर रोजी सेवेतून निवृत्त होणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे प्रमुख दिबेक दिबरॉय यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.