Coronavirus
Coronavirus

खळबळजनक! लस घेऊनही एकाच हॉस्पिटलमधील 37 डॉक्टर्संना कोरोना

नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येनं उच्चांक गाठला आहे. सध्या भारत दुसऱ्या लाटेचा सामना करत असून मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या आढळून येत आहे. गेल्या 24 तासांत देशात 685 मृत्यू झाले असून देशातील अनेक राज्यांमध्ये नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे. इतकं केल्यानंतरही रुग्णसंख्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता दिल्लीत एक धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील तब्बल 37 डॉक्टर कोरोनाबाधित झाले आहेत. विशेष म्हणजे या डॉक्टरांना कोरोनाची लसही देण्यात आली आहे. डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.  कोरोनाची लागण झालेल्या डॉक्टर्सपैकी 32 जण होम क्वारंटाइन असून 5 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी नुकतंच सांगितलं होतं की, पॉझिटिव्हिटी रेट महाराष्ट्रात २५ टक्के, छत्तीसगडमध्ये १८ टक्के आणि अनेक राज्यांमध्ये १० टक्क्यांच्या वरती आहे. दिल्लीमध्येही तो ६ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. देशभरात अशाच प्रकारचा ट्रेंड सुरु आहे. शहरी भागात जास्त आणि ग्रामीण भागामध्ये कमी कोरोना रुग्णसंख्या आढळून येत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. 

वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता दिल्लीमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. रात्री  १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आलाय. हा आदेश ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. दिल्ली सरकारने जारी केलेल्या नाईट कर्फ्यूच्या गाईडलाईन्सनुसार, ट्रॅफिक मुव्हमेंटमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. जे लोक कोरोनावरील लस घेण्यासाठी बाहेर पडत आहेत, त्यांना प्रवासाची मुफा असेल, पण त्यांनी ई-पास जवळ ठेवावा. किराना सामान, फळ, भाज्या, दुध, औषधसंबंधित कर्मचाऱ्यांना ई-पासच्या माध्यमातूनच प्रवासाची मुफा असेल. याशिवाय प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला ई-पासच्या माध्यमातूनच प्रवास करता येईल.

आयडी दाखवून प्रायवेट डॉक्टर्स, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ यांना प्रवासास मुभा देण्यात येईल. तिकीट दाखवल्यानंतर विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि बस स्टेशनवर जाणाऱ्या प्रवाशांना सोडण्यात येईल. गरोदर महिला आणि उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यापार्श्वभूमीवर निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यात लॉकडाऊन लागू करणार नसल्याचं म्हटलं आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com