अतिक अहमदच्या मेहुणा सरकारी डॉक्टर पदावरून निलंबित उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय

Atiq Ahmed
Atiq AhmedSakal

मेरठ (यूपी): उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात तैनात असलेले डॉ. अखलाक यांना मंगळवारी आरोग्य विभागातून निलंबित करण्यात आले. अखलाकच्या निलंबनाची पुष्टी करताना मेरठचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अखिलेश मोहन यांनी सांगितले की, सरकारच्या आदेशानुसार मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.

Atiq Ahmed
Sushma Andhare : अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारेंची शिंदेंच्या शिवसेनेला सोडचिट्ठी, कारण...

2005 मध्ये बसपा आमदार राजू पाल यांच्या खून खटल्यातील प्रमुख साक्षीदार उमेश पाल यांच्या हत्येतील आरोपींना आश्रय आणि पैसे पुरवल्याच्या आरोपावरून अखलाक अहमद यांना या महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आली होती. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले की, डॉ. अखलाक मेरठ जिल्ह्यातील भवनपूर सार्वजनिक आरोग्य केंद्रात बालरोगतज्ञ म्हणून तैनात होते.

Atiq Ahmed
Abdul Sattar : शेतीच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवा; अब्दुल सत्तार यांचा अधिकाऱ्यांना आदेश

एसटीएफचे पोलिस अधीक्षक ब्रिजेश सिंह यांनी यापूर्वी सांगितले होते की, अखलाक यांना उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) 1 एप्रिल रोजी नौचंडी येथून अटक केली होती. त्यानंतर त्यांना प्रयागराज येथे नेले होते.

उमेश पाल आणि त्यांचे पोलीस सुरक्षा रक्षक संदीप निषाद आणि राघवेंद्र सिंह यांची 24 फेब्रुवारी रोजी प्रयागराजमधील धूमगंज येथील पाल यांच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com