Live:उत्तर प्रदेशातील गँगस्टर विकास दुबेच्या मुसक्या आवळल्या; मध्य प्रदेशात उज्जैनमध्ये अटक 

टीम ई-सकाळ
गुरुवार, 9 जुलै 2020

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, विकास दुबे उज्जैनमधील महाकाल मंदिरात दर्शनासाठी आला होता. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली.

उज्जैन : उत्तर प्रदेशात कानपूरमध्ये आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गँगस्टर विकास दुबे याला मध्य प्रदेशात उज्जैनमध्ये अटक करण्यात आलीय. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, विकास दुबे उज्जैनमधील महाकाल मंदिरात दर्शनासाठी आला होता. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली. मंदिरातील सिक्युरिटी गार्डने त्याला ओळखल्यानंतर स्थानिक पोलिसांनी, त्याला अटक केली.

आणखी वाचा - उत्तर प्रदेशात आणखी एक एन्काउंटर, विकास दुबेच्या दोन साथीदारांचा खात्मा

काय घडले? कसे घडले?
3 जुलै रोजी कानपूरमध्ये पोलिस आणि गँगस्टर विकास दुबेच्या टोळीत चकमक
चकमकीत उत्तर प्रदेशचे आठ पोलिस हुतात्मा 
3 जुलैनंतर विकास दुबे फरार, देशभरात विकास दुबेच्या टोळीची धरपकड 
9 जुलै रोजी पहाटे दुबेचे दोन साथीदारांना एन्काउंटरमध्ये ठार 
9 जुलै रोजी सकाळी विकास दुबे उज्जैनमध्ये दाखल
उज्जैनमधील महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेला होता विकास दुबे 
मंदिरातील सिक्युरिटी गार्डने विकास दुबेला ओळखले 
स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेऊन केली अटक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gangster vikas dubey arrested ujjain madhya pradesh