esakal | उत्तर प्रदेशात आणखी एक एन्काउंटर; विकास दुबे टोळीतील दोघांचा खात्मा
sakal

बोलून बातमी शोधा

uttar pradesh encounter close aide of vikas dubey dead

प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभात मिश्रा याला कानपूरला आणण्यात येत होते. त्यावेळी पोलिसांनी व्हॅन बंद पडली होती. या परिस्थितीचा फायदा घेऊन प्रभात पळून जात होता. त्यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबारही केला. त्यात काही पोलिस जखमी झाले आहेत, असेही प्रशांत कुमार यांनी सांगितले. 

उत्तर प्रदेशात आणखी एक एन्काउंटर; विकास दुबे टोळीतील दोघांचा खात्मा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

कानपूर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर आणि कानपूरमध्ये एन्काउंटरमध्ये आठ पोलिसांची हत्या करणारा विकास दुबे याला पकडण्याच्या हालचालींना वेग आला असून, पोलिसांना विकास दुबेच्या जवळ पोहोचण्यात यश येत असल्याचं बोबलं जात आहे. विकास दुबेच्या आणखी दोघा साथीदारांना पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केलंय. दरम्यान, इटवा येथे झालेल्या कारवाईत विकास दुबेचा दुसरा साथीदार बउअनही ठार झाल्याची माहिती आहे. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विकास दुबेचा जवळचा साथीदार प्रभात मिश्रा याला पोलिसांनी काल अटक केली होती. काल या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली होती. त्यात प्रभातचा समावेश होता. परंतु, कोठडीतून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रभातला पोलिसांनी गोळ्या घातल्या. प्रभातकडून झालेल्या प्रत्यत्नानंतर प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या कारवाईत प्रभात मारला गेल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या कायदा सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस संचालक प्रशांत कुमार यांनी ही माहिती दिली. प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभात मिश्रा याला कानपूरला आणण्यात येत होते. त्यावेळी पोलिसांनी व्हॅन बंद पडली होती. या परिस्थितीचा फायदा घेऊन प्रभात पळून जात होता. त्यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबारही केला. त्यात काही पोलिस जखमी झाले आहेत, असेही प्रशांत कुमार यांनी सांगितले. 
 

loading image