

CM Yogi Adityanath
sakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घोषणा केली आहे की, पौराणिक महत्त्व असलेल्या गढ़मुक्तेश्वर येथील कार्तिक मेळा आता 'मिनी कुंभ'च्या धर्तीवर आयोजित केला जाईल. दरवर्षी या मेळ्यात ४० ते ४५ लाख भाविक गंगा नदीच्या किनारी स्नान आणि दीपदानासाठी येतात, त्यामुळे सर्व व्यवस्था वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.