
मी हट्टी आशावादी असं म्हणत अदाणींनी वर्तवलं देशाचा विकास दराबाबत भाकित
मुंबई : भारतीय उद्योगपती आणि आदानी समूहाचे संस्थापक अध्यक्ष गौतम अदानी यांनी काही दिवसांपूर्वीच मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनण्याचा बहुमान पटकावला आहे, दरम्यान त्यांनी त्यांच्या उद्योग समूहातील भागदारकांना केलेल्या संबोधनात देशाच्या विकास दराबाबत भाकित केलं आहे.
अदानी यांनी त्यांच्या भागधारकांना उद्देशून केलेल्या एका संबोधनात, गेल्या १८ महिन्यांत कोविड -१९ ची महामारी स्थिती भारताने इतर देशांच्या तुलनेत चांगली हाताळली हे नाकारता येणार नाही. या १८ महिन्यांत भारतात प्रतिबंधक लसीचे २०० कोटी डोस देण्यात आले - ही संख्या उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि युरोप यांच्या एकूण लोकसंख्ह्येपेक्षा जास्त आहे. यातून जगाला एक ऐतिहासिक शिकवण मिळाली असेल. कितीही कठीण परिस्थिती असली तरी भारत त्यातून सावरून पुन्हा उभा राहू शकतो हेच यातून सिद्ध झाले असल्याचे म्हटले आहे.
अदानी पुढे म्हणाले की, "सध्याच्या रशिया युक्रेन संघर्षांत भारताने कोणतीही बाजू न घेता ठाम भूमिका घेतली आहे. या राजनीतिक भूमिकेतून दिसलेल्या भारताच्या आत्मविश्वासाबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे. भविष्यातील बहुध्रुवीय आंतरराष्ट्रीय स्थितीत भारत अभिमानाने आपले स्थान टिकवेल याचे हे द्योतक आहे. वातावरणातील बदलांबाबत आपल्याला अनेकदा उपदेश केला जातो, पण भारताने कोव्हिड च्या काळात आणि ऊर्जा संकटात असूनही पुनर्वापर करण्याच्या स्रोतांपासून वीज निर्मितीत वाढ केली आहे. अनेक विकसित देशांनी त्यांची पुनर्वापरक्षम वीजनिर्मिती ची उद्दिष्टे स्थगित ठेवली असताना भारताने केलेली हे कामगिरी लक्षणीय आहे."
हेही वाचा: स्मिता ठाकरे पोहोचल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला; चर्चांना उधाण
ते पुढे म्हणाले की, "पुनर्वापर करण्याच्या स्रोतांपासून होणा-या वीज निर्मितीची भारताची क्षमता २०१५ पासून आजवर ३०० टक्क्यांनी वाढली आहे. अशा वीजनिर्मिती भारतात २०२१-२२ मध्ये २०२०-२१ च्या तुलनेत १२५ टक्के भांडवल गुंतवण्यात आलेले आहे. विजेच्या वाढीव मागणीपैकी ७५ टक्क्यांहून जास्त मागणी पुनर्वापरक्षम स्रोतांपासून निर्मिली जात असून ही प्रगती रोखणे आता कोणालाही शक्य नाही. या सर्व पार्श्वभूमीवर भारताने समतोल साधत केलेल्या वाटचाली बद्दल सरकारला पूर्ण श्रेय द्यावे लागेल" असे त्यांनी म्हटले.
यासोबतच कोव्हिड संकटातून सावरत असताना अनेक बड्या देशांना मंदीचा सामना करावा लागत असतानाच भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने प्रगती करत आहे. आपल्या व्यवसायाच्या संदर्भात मिळालेल्या संकेतांवरून मी असे खात्रीने म्हणेन की भारताच्या अर्थव्यवस्थेची ८ टक्के अंदाजित वृद्धी प्रत्यक्ष पहायला मिळेल, असे गौतम अदानी यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना त्यांनी "मी एक हट्टी आशावादी आहे. उद्योजक म्हणून कसे विकसित व्हायचे आणि उत्कर्ष साधायचा याचे शिक्षण देणारा भारत हा एक बलशाली देश आहे यावर माझी कायमच श्रद्धा आहे." असे देखील म्हटले आहे.
हेही वाचा: Population News : भारताची लोकसंख्या ४१ कोटींनी होईल कमी - संशोधन
Web Title: Gautam Adani Predicted The Growth Rate Of The India
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..