
स्मिता ठाकरे पोहोचल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला; चर्चांना उधाण
मुंबई - राज्यातील उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या कुटुंबाविरुद्ध दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. पुर्वाश्रमीचे शिवसेना नेते सध्या उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत असून राज ठाकरे यांनी देखील उद्धव ठाकरे यांना अविश्वासू म्हटलं होतं. त्यातच आता ठाकरे कुटुंबातील आणखी एक व्यक्ती समोर आली असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. (Smita Thackeray news in Marathi)
हेही वाचा: शिवसेना आपलीच हे सिद्ध करायला ठाकरे पुरावे देणार? उद्धव ठाकरे म्हणतात...
उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध याआधी शिवसेनेशी निगडीत अनेक नेते एकत्र येत असल्याचं चित्र सध्या राज्यात दिसून येत आहे. त्यातच स्मिता ठाकरे यांनी शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर स्मिता म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांनी मी आदराने बघते. ते आमच्यासाठी खूप जुने कार्यकर्ते आहेत. एक व्यक्ती म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले आहे, असही स्मिता ठाकरे यांनी नमूद केलं.
हेही वाचा: ''शिवसेना सो़डल्यानंतर आई-वडिलांच्या पुण्याईमुळे वाचलो''
स्मिता ठाकरे या बाळासाहेब ठाकरे यांच्या सूनबाई असून त्या जयदेव ठाकरे यांच्या पत्नी होत्या. जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांचा घटस्फोट झालेला आहे. स्मिता ठाकरे यांना राजकीय महत्त्वाकांशी होती. त्यांना राजकीय क्षेत्रात कारकिर्द करायची होती. मात्र त्या मागील काही काळापासून राजकारणापासून दूर आहेत. आता स्मिता ठाकरे पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
Web Title: Smita Thackeray Meet Eknath Shinde
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..